हेडलीला ताब्यात घेण्यास गंभीर नव्हता भारत : विकिलिक्स

September 4, 2011 1:31 PM0 commentsViews: 1

04 सप्टेंबर

विकिलिक्सच्या आणखी एका केबलवरून भारतात वाद निर्माण झाला आहे. 26/11 च्या हल्ल्यातला आरोपी डेव्हिड हेडलीचा अमेरिकेकडून ताबा मिळवण्याच्या भारताच्या प्रयत्नाशी संबंधित ही केबल्स आहेत. त्यात हेडलीला भारतात आणण्याबाबत सरकार गंभीर नसल्याचं म्हटलं आहे.

याच मुद्द्यावरून डाव्या पक्षांनी सरकारकडे स्पष्टीकरण मागितलंय. पण हेडलीचा ताबा मिळवण्याबद्दल गंभीर असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. आणि त्याच्याविरोधात लवकरच चार्जशीट दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले. 2009 मधील विकिलिक्सचे हे केबल्स आहेत. अमेरिकेचे भारतातील तत्कालीन राजदूत टिमोथी रोमेर यांच्याशी माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम के नारायणन यांनी केलेली ही बातचीत आहे.

भारत सरकारची हेडलीचा ताबा मिळवण्याची मागणी केवळ एक दिखावा असल्याचे नारायणन यांनी म्हटलं होतं. सरकार लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतंय. हेडलीचा ताबा मिळावा ही भारत सरकारची सध्या इच्छा नसल्याचंही नारायणन यांनी म्हटल्याचा उल्लेख विकिलिक्समध्ये आहे.

close