विमान वाहतूक विस्कळीत

September 3, 2011 3:31 PM0 commentsViews: 4

03 सप्टेंबर

मुंबई विमानतळावरील मुख्य रनवेवर काल झालेल्या विमान अपघातानंतर 30 तासांपेक्षा जास्त वेळ झाला आहे अजूनही मुख्य रनवे बंद आहे. त्यामुळे सर्व विमानं 15 ते 30 मिनीटे उशीरानं उडाण घेत आहे. आज दुपारपर्यंत एअर ट्रॅफिक पूर्ववत होईल असं सांगण्यात येत होतं पण रनवेवरून विमान हटवण्याच्या कामाची डेडलाईन आता पुन्हा वाढवण्यात आली. त्यामुळे आणखी काही काळ हा रनवे बंद असणार आहे. दरम्यान डीजीसीए (DGCA) नं या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. काल शुक्रवारी पहाटे मुंबई विमानतळावर तुर्कस्थानच्या एअरवेजचं विमान धावपट्टीवरुन घसरलं. पण यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. पहाटे 4.13 वाजता ही घटना घडली. या विमानात 97 प्रवासी होते.

close