मुंबईत रंगली अपंगांसाठी क्रिकेट स्पर्धा

November 16, 2008 5:14 AM0 commentsViews: 12

16 नोव्हेंबर, मुंबईविनायक गायकवाड26 वर्षांचा दीपक अंबरनाथच्या आदर्श भारत बालविद्यामंदिरात शिक्षक आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन फॉर डिसेबल्स या संस्थेनं आयोजित केलेल्या अपंगांच्या क्रिकेट स्पर्धेत तो उत्कर्ष टीमचा कॅप्टन आहे. या स्पर्धेत एकूण 12 टीम सहभागी झाल्या आहेत.' मी या स्पर्धेत 2003 पासून सहभागी होत आहे. मुलांमधले अनेक सुप्त गुण या स्पर्धेत बाहेर पडतात. माझ्या मुलांनीही आंतरराष्ट्रीय स्पर्धात सहभागी व्हावं अशी माझी इच्छा आहे ' अशी प्रतिक्रिया दीपक चव्हाण यांनी दिली.शारीरिक अंपगत्वासोबतच येणारं मानसिक अंपगत्व झुगारून देण्यासाठी या स्पर्धेत अनेक खेळआडू मैदानावर उतरले. त्यांना समाजाकडून सहानुभूती नकोय, हवाय तो मैत्री आणि मदतीचा हात. जिद्दीच्या जोरावर शारिरीक अपंगत्वावर मात करुन ही मुलं खेळतात, पण त्यांच्यासमोर खर आव्हान आहे ते सरकार आणि समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याचं. निवडणुकीत आश्वासनांची खैरात करणारे राजकीय नेते निवडून येताच दिलेली आश्वासने विसरूनही जातात. पण जर अंपंगांचा खर्‍या अर्थाने विकास करायचा असेल, तर अशा स्पर्धांना अधिकाधिक उत्तेजन देण्याची गरज आहे.

close