गणेशोत्सवात झाली राजकीय नेत्यांची भाऊगर्दी

September 3, 2011 12:05 PM0 commentsViews: 3

03 सप्टेंबर

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या लाडक्या गणरायाचे स्वागत करण्यास लहानापासून ते थोरांपर्यंत सर्वांची गर्दी केली. तर दुसरीकडे नाशिकमध्ये गणपती उत्सव राजकीय रंगांनी रंगला आहे. चौकाचौकात गणेशभक्तांसाठी शुभेच्छा देणारे मोठ मोठे होर्डिंग्ज लागले आहेत. दिशादर्शक कमानीही याच फलकांनी भरल्या आहेत. या शुभेच्छा आहेत राजकीय पक्षांच्या आणि कार्यकर्त्यांच्या. यात बाप्पाबद्दलचा भाव कमी आणि राजकीय आवच जास्त आहे. कारण अर्थातच येत्या काही महिन्यांवर नाशिक महापालिकेची निवडणूक येऊ घातली आहे. त्यासाठी इच्छूकांनी गणपतीच्या माध्यमातून आपापल्या प्रचाराची संधी साधून घेतली. गणेश मंडळांच्या मंडपांवर गणपतीच्या बरोबरीनं इच्छुकांचे आणि नेत्यांचे फोटो झळकत आहेत. रस्ते पक्षांच्या झेंड्यांनी रंगले आहेत.

close