कोकण रेल्वे संथ गतीने ; मुंबई-गोवा हायवेची वाहतूक ठप्प

September 5, 2011 5:20 PM0 commentsViews: 31

05 सप्टेंबर

मुंबई-गोवा हायवेवर आज पुन्हा एकदा दरडीचं विघ्न कोसळलं होतं. पण आता ही दरड बाजूला काढण्यात यश आलेलं आहे. पण दोन दिवसात तीन वेळा दरड कोसळल्यामुळे कशेडी घाटातील रस्त्याची दुर्दशा झाली आहे. हा रस्ता जोपर्यंत पूर्ववत होत नाही, डागडुजी पूर्ण होत नाही तोपर्यंत मुंबई गोवा दरम्यानची वाहतूक पूर्ववत होणार नाही. गौरीगणपतीसाठी कोकणात गेलेल्या भाविकांना आणि इतर प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करण्यास सांगण्यात येतंय. कालपासून पुणे कोल्हापूर मार्गाने ही सगळी वाहतूक वळवण्यात आलेला आहे आणि आता तर या पर्यायी मार्गावर सुध्दा ट्रॅफिक जाम व्हायला लागलेला आहे.

खेड कशेडी घाटात आज तीसर्‍यांदा दरड कोसळली. काल दुपारी दरड कोसळ्यामुळे मुंबई गोवा महामार्ग बंद करण्यात आला होता. आज पावसानं विश्रांती घेतल्यामुळे बर्‍याच मोठ्या प्रमाणावर दरड हटवण्यात येत होती. मात्र अचानक काही वेळापूर्वी दरड कोसळ्यामुळे महामार्ग पूर्णपणे बंद झाला . खेड कशेडी घाटात पडलेली दरड काढण्याचं काम सुरू आहे. मोठमोठाले दगड ब्लास्टींग द्वारे फोडून ते खाली दरीत ढकलण्याचे काम सुरू आहे. पण अजून वरचा सुद्धा काही भाग खचल्यानं दरड कोसळण्याची भीती जास्त आहे. दरीच्या बाजूला असणार्‍या महामार्गाचाही काही भाग खचून दरीत कोसळला आहे. अजून दोन दिवस हा महामार्ग बंद राहण्याची शक्यता वर्तविण्यात येतेय. दरम्यान हायवेवरची वाहतूक कोल्हापूरमार्गे एनएच-4 वरून वळवण्यात आली आहे.

close