कृष्णा – वारणा नदीकाठच्या 97 गावांना पुराचा फटका

September 5, 2011 9:50 AM0 commentsViews: 3

05 सप्टेंबर

सातार्‍यातील कोयना आणि चांदोली धरणातून अतिरिक्त पाणी सोडल्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या काठच्या 97 गावंाना पुराचा मोठा फटका बसला आहे. वाळवा तालुक्यातील कोटभागला 35 वर्षीय एक सायकल स्वार इसम पुराच्या पाण्यात वाहून गेला. वाहून गेलेल्या या तरूणाचा शोध सुरू आहे.

वाळवा आणि पलूस तालुक्यातील अनेक गावं पुरामुळे बाधीत झाली आहेत. भिलवडी, धगाव, मौजे डीग्रज आणि वाळव्यातील हाळभाग, पेठभागला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. तर सांगली शहरातील मगर मच्छ कॉलनी, कर्नाळारोड, सुर्यवंशी आणि इनामदार प्लॉटमध्ये पाणी शिरले आहे. पुरपरस्थितीमुळे 1000 कुटुंबांनी स्थलांतर केलं. कृष्णा आणि वारणा नदीच्या काठची शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. सांगलीत आयुर्वीन पुलाजवळ पाण्याची पातळी 40 फुटावर गेली.

close