सौमित्र सेन यांच्याविरोधात महाभियोग रद्द

September 5, 2011 10:30 AM0 commentsViews: 3

05 सप्टेंबर

न्या. सौमित्र सेन यांच्याविरूध्द लोकसभेत महाभियोग दाखल केला जाणार नाही. सेन यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केला आहे. त्यामुळे महाभियोगाद्वारे बडतर्फ होणारे पहिले न्यायाधीश होण्याच्या नामुष्कीपासून सेन बचावले आहे. सौमित्र सेन यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याकडे पाठवला होता.

राष्ट्रपतींनी तो राजीनामा स्वीकारल्याचे नोटीफिकेशन काढलंय. महभियोगाच्या मुद्द्यावर लोकसभेच्या अध्यक्षा मीरा कुमार आज ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करणार आहेत. राष्ट्रपतींनी राजीनामा स्वीकारल्याने महाभियोगाची प्रक्रिया रद्द करा अशी सूचना सरकार मीरा कुमार यांना करण्यात येणार आहे.

19 ऑगस्टला त्यांना राज्यसभेनं महाभियोग चालवून बडतर्फ केलं होतं. लोकसभेतही त्यांच्यावर महाभियोग चालणार होता. पण राष्ट्रपतींनी राजीनामा स्वीकारल्याने महाभियोगाद्वारे बडतर्फ होणारे पहिले न्यायाधीश होण्याच्या ठपक्यापासून त्यांची सुटका झाली आहे. कोर्टाच्या निधीची अफरातफर केल्याचे आणि बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचे आरोप सेन यांच्यावर आहेत.

close