न्यायमूर्ती सौमित्र सेन यांनी पाठवला राष्ट्रपतींकडे राजीनामा

September 3, 2011 3:48 PM0 commentsViews: 5

03 सप्टेंबर

कोलकाता हायकोर्टाचे न्यायमूर्ती सौमित्र सेन यांनी राष्ट्रपतींकडे राजीनामा पाठवला आहे. सेन यांच्या विरुद्ध संसदेत महाभियोग सुरू आहे. पण महाभियोगाचा निकाल लागण्याआधीच त्यांनी राजीनामा पाठवला. सेन यांच्या वकिलांनी राष्ट्रपती आणि केंद्रीय कायदा मंत्र्यांकडे राजीनामा पाठवला. शिवाय लोकसभा अध्यक्षांकडेही राजीनामा पाठवण्यात आला. सेन यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे. राज्यसभेनं दोन आठवड्यांपूर्वी त्यांच्याविरोधातला ठराव बहुमतानं मंजूर केला होता. येत्या सोमवारी लोकसभेत महाभियोग चालणार आहे.

close