पृथ्वीमध्ये ‘ करोडों में एक ‘ चा प्रयोग

November 16, 2008 5:17 AM0 commentsViews: 3

16 नोव्हेंबर, मुंबईमाधुरी निकुंभपृथ्वी फेस्टिव्हल मध्ये विविध विषयांवरची विविध नाटकं सादर झालीत. या फेस्टिव्हलमध्ये मकरंद देशपांडेचं 'करोडों में एक ' हे नाटकही सादर झालं. मकरंद देशपांडेनं लिहिलेलं आणि त्यानेच दिग्दर्शित केलेलं हे नाटक सत्यदेव दुबेंच्या आवडत्या नाटकांपैकी एक आहे. ' वास्तव आणि मनोव्यापार यातली धुसर सीमारेषा पार केल्यावरची परिस्थिती या नाटकात उलगडली आहे ' अशी प्रतिक्रिया या नाटकाचा दिग्दर्शक आणि प्रमुख अभिनेता मकरंद देशपांडे यांनी दिलीया नाटकाचा विषय तसा गंभीर आहे. एका करोडपती माणसाची संपत्ती कमी होत जाते आणि यामुळे तो मानसिक रुग्ण बनतो. आणि पुढे काही वर्षांनी तोच आजार त्याच्या मुलालाही जडतो. नाटकाचा विषय अतिशय नाजुक पध्दतीने हाताळला आहे. मकरंद देशपांडेनं वडिलांचा भूमिका साकारलीय तर त्याचा मुलगा झालाय यशपाल यादव. वडील-मुलाचं नातं या नाटकात उलगडलण्यात आलं आहे.

close