शेहला मसूद मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल

September 3, 2011 4:59 PM0 commentsViews: 7

03 सप्टेंबर

भोपाळच्या आरटीआय कार्यकर्त्या शेहला मसूद यांच्या मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआय अधिकार्‍यांनी आज ही माहिती दिली. दरम्यान, मसूद यांच्या हत्येपूर्वी त्यांनी आरटीआय अंतर्गत भाजपच्या एका खासदाराकडून चालवण्यात येणार्‍या एका एनजीओसंबंधी माहिती मागितली होती. भाजपचे राज्यसभेचे खासदार अनिल दवे नर्मदा समग्र ही एनजीओ चालवतात. पण या एनजीओच्या कारभारात पैशांची अफरातफर करण्यात आल्याचा मसूद यांना संशय होता. त्यामुळे त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली याबाबत माहिती मागवली होती. मसूद या स्वत: आरएसएस पुरस्कृत श्यामा प्रसाद मुखर्जी ट्रस्टसाठी काम करायच्या. पण संघ परिवारातील काही लोकांनी मसूद या आयएसआयच्या एजेंट असल्याचं आरोप केला होता.

close