सरकारकडून शिक्षण सेवकांना वेतवाढीचे गिफ्ट

September 5, 2011 12:54 PM0 commentsViews: 4

05 सप्टेंबर

शिक्षक दिनानिमित्तानं आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिक्षण सेवकांना एक अनोखी भेट दिली आहे. शिक्षण सेवक हे नाव आता बदललं जाणार आहे. त्याचबरोबर त्यांना मानधनही वाढवून मिळणार आहे. हे मानधन नेमकं किती असेल याबाबत येणार्‍या आठवडाभरातन निर्णय घेतला जाईल अशी घोषणाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. ते आज औरंगाबादमध्ये बोलत होते. शिवाय आदर्श शिक्षकांना 2006 पासून दोन वेतनवाढी देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची घोषणाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

close