सातार्‍यात नदीकाठच्या 50 गावांचा संपर्क तुटला

September 4, 2011 8:04 AM0 commentsViews: 3

04 सप्टेंबर

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहेत. मात्र कोयना धरणाचे दरवाजे 16 फूटापर्यंत उघडण्यात आल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नदीकाठच्या 50 गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातल्या चार पुलांवरुन पाणी वाहत आहे. पाटण आणि हेळवाक गावातील काही भागात पाणी शिरलं आहे. पाटण तालुक्यातील 72 कुटुंबांना, तर कराडमधील 30 आणि सातारा शहरातील 12 कुंटुबांना जिल्हापरिषदेच्या शाळेत हलवण्यात आलंय. वाईचं गणपती मंंदिर आणि सातार्‍यातील क्षेत्र माऊली मंदिरांना पाण्यानं वेढले आहे.

close