भूसंपादन विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

September 5, 2011 5:32 PM0 commentsViews: 18

05 सप्टेंबर

अनेक दिवसांपासून वादात सापडलेल्या नव्या भूसंपादन विधेयकाला आज कॅबिनेटने मंजुरी दिली. हे विधेयक येत्या बुधवारी म्हणजे सात सप्टेंबर रोजी संसदेत मांडलं जाईल. जयराम रमेश यांच्या पुढाकाराने बनवलेल्या या विधेयकाच्या मसुद्यावर कॅबिनेटमध्ये शरद पवार, विलासराव देशमुख आणि वीरप्पा मोइलींसारख्या मंत्र्यांनी प्रश्न उपस्थित केले.

हे विधेयक उद्योग क्षेत्रावर अन्यायकारक असल्याचे विरोध करणार्‍यांचं म्हणणं होतं. हा नवा भूसंपादन कायदा मंजूर झाला, तर शहरी भागातल्या जमिनीचा मोबदला हा बाजारभावापेक्षा दुपटीनं मिळणार आहे. तर ग्रामीण भागात तो चौपट असेल. एकापेक्षा जास्त पीक देणारी ओलिताखालची जमीन संपादन करणे हा शेवटचा पर्याय असेल असंही या बिलात म्हटले आहे. पण सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी या विधेयकाला विरोध केला आहे.

close