जे.डे हत्या प्रकरणी मारेकर्‍यांना सीम कार्ड देणार्‍याला अटक

September 5, 2011 4:44 PM0 commentsViews: 2

05 सप्टेंबर

जे.डे हत्या प्रकरणी जॉन पॉलसनला अटक करण्यात आली आहे. जे. डेंची हत्या करणार्‍यांना मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणातला आरोपी सतिश काल्या हा छोटा राजनशी ज्या फोननी बोलला होते ते सीम कार्ड जॉन पॉलसननं दिले होते असा त्याच्यावर आरोप आहे. जे.डे हत्या प्रकरणात अटक झाल्यांची संख्या आता दहा झालेली आहे आणि लवकरच आणखी काही जणांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे.

close