‘बॉडीगार्ड’चा पाच दिवसांत 88 कोटींचा गल्ला

September 5, 2011 5:12 PM0 commentsViews: 6

05 सप्टेंबर

सलमान खानच्या बॉडीगार्ड चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दणदणीत व्यवसाय केला आहे. ईदच्या दिवशी रिलीज झालेल्या बॉडीगार्डने पाच दिवसांत तब्बल 88 कोटींचा गल्ला जमवला आहे. सिनेमाने पहिल्याच दिवशी साडे एकवीस कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जमवलं. ब्लॉकबस्टर दबंगलाही या सिनेमानं मागे टाकले आहे. दबंगने पहिल्या दिवशी साडे चौदा कोटींची मजल मारली होती. सलमान सध्या लॉज एंजलिसमध्ये उपचार घेतोय. सिनेमाला मिळालेल्या घवघवीत यशामुळे सलमान खाननं प्रेक्षकांचे आभार मानले आहे.

close