धुळ्यात टँकर नदीत कोसळून 3 ठार

September 6, 2011 9:32 AM0 commentsViews: 1

06 सप्टेंबर

धुळे जिल्ह्यातील पिंपळनेरमध्ये काल रात्री 8:30 च्या सुमारास एलपीजीच्या गॅस टँकरचा स्फोट होऊन टँकर पांझरा नदीत कोसळला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जणं जखमी झाले आहेत. आणखीही काही लोक यात दगावल्याची भीती व्यक्त होत आहे. शोधकार्य सुरू आहे. टँकरच्या स्फोटात लागलेल्या आगीत दोन कार, दोन ट्रक आणि दोन रिक्षा जळाल्या. आगीमुळे परिसरातील दुकानंही जळून खाक झाली आहेत. त्यामुळे मालमत्तेचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. दरम्यान, या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना 1 लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे.

close