अलिबागजवळ 5 बोटी बुडाल्या ; 12 खलाशी बेपत्ता

September 4, 2011 11:19 AM0 commentsViews: 4

04 सप्टेंबर

अलिबाग जवळच्या समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या पाच बोटी बुडाल्या आहेत. खोल समुद्रात आलेल्या वादळामुळे या बोटी बुडाल्या आहेत. चंद्रप्रभा, योगेश्वर कृपा आणि सागरेश्वर कृपा अशी बुडालेल्या बोटींपैकी काही बोटींची नावं आहेत. अलिबाग आणि साखर कोळी वाड्यातून या बोटी मासेमारीसाठी गेल्या होत्या. पण वादळीवारे आणि उसळलेल्या लाटांमुळे बोटींना जलसमाधी मिळाली. त्यामुळे बोटीवरील सगळे खलाशी समुद्रात पडले त्यापैकी दोन जण पोहत पोहत अलिबागच्या किनार्‍याला पोहोचले. तर 10 जणांना इतर मासेमारी बोटींनी वाचवलं आहे. या पाच बोटींवरील 12 खलाशी अजूनही बेपत्ता आहेत. दरम्यान रत्नागिरीमधील भगवती किल्ल्याजवळच्या समुद्रात बुडणार्‍या पाच पर्यटकांपैकी चौघाना वाचवण्यात यश आलंय तर एकाला शोध सुरु आहे.

close