विकिलिक्सच्या मालकाला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवा – मायावती

September 6, 2011 10:15 AM0 commentsViews: 2

06 सप्टेंबर

भ्रष्टाचारासंबंधी विकिलिक्सने केलेल्या गौप्यस्फोटामुळे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती चांगल्याचं संतापलेल्या दिसतात. त्यांनी विकिलिक्सच्या मालकाला वेडं ठरवून त्यांना सरळ वेंड्याच्या हॉस्पिटलमध्ये पाठवावे अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर सतीशचंद्र मिश्रांना क्लीन चीट देत विरोधकांचंच हे षडयंत्र असल्याचा आरोप केला.

विकिलिक्सच्या जंजाळात काल बहुजन समाज पक्षाचा हत्ती ही अडकला. विकिलिक्सने मे 2007 ते 2009 दरम्यान अमेरिकी दूतावासाने पाठविलेल्या केबलमध्ये मायावतींबद्दल गौप्यस्फोट केला. मायवती आपल्यावर विष प्रयोग होण्याच्या भिती पोटी आपल्या खास खानावळीत दोन जणांना चव चाखण्यासाठी नियुक्त केले होते. तर आपल्या घरांपासून ते कार्यालयापर्यंत जाण्यासाठी खास रस्ता तयार केला आहे. आणि आपल्याला आवडलेली सँडल्स आणण्यासाठी रिकामे विमान मुंबईला पाठवत असतं असा गौपस्फोट विकिलिक्सने केला. या स्फोटानंतर मायवती चांगल्याचं संतापल्या. विकिलिक्सच्या मालकाला वेड लागलं आहे. त्याला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा अशी मागणी मायवतींनी केली. त्याचबरोबर सतीशचंद्र मिश्रांना क्लीन चीट देत विरोधकांचंच हे षडयंत्र असल्याचा आरोप केला. मायावती यांचा भ्रष्टाचाराशी संबंध असल्याचे मिश्रा यांनी अमेरिकन वकिलाती मधल्या एका अधिकार्‍याला सांगितल्याचा गौप्यस्फोट विकिलिक्सने केला आहे.

close