गौरी आल्या माहेरी

September 4, 2011 7:48 AM0 commentsViews: 28

04 सप्टेंबर

महाराष्ट्राचं आराध्य दैवत गणरायाच्या आगमनानंतर आज घरोघरी गौरींचही आगमन होतं आहे. गौरी तीन दिवसाकरता माहेरी येतात आणि मग तिच्या स्वागतासाठी तर्‍हेतर्‍हेचे पदार्थ बनवले जातात. विभाग आणि समाजाप्रमाणे गौरी आणण्याच्या पद्धती बदलतात. कोकणात काही ठिकाणी खड्यांच्या तर काही ठिकाणी तेरड्याची वनस्पती आणली जाते आणि त्यांना गौरी म्हणून पूजलं जातं. त्यासोबत मग मुखवटे लावून गौरीला साडी नेसवून दागिने घातले जातात. तर विदर्भात थेट गौरींचे मुखवटेच पूजले जातात. काही घरांमध्ये ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा दोन्ही गौरी पूजल्या जातात. मात्र काही घरांमध्ये केवळ ज्येष्ठा गौरीलाच पूजलं जातं.

close