सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी लवकरच प्राधिकरण !

September 6, 2011 3:26 PM0 commentsViews: 7

06 सप्टेंबर

राज्यातल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी प्राधिकरण आणण्याचं विचार सरकार करतं आहे. अशा संस्थांचे राज्यातील प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळेच त्यांचे वेगवेगळे प्रश्न सोडवण्यासाठी सहकार मंत्रालयाशिवाय दुसरा विभाग नाही. त्यामुळेच त्यांच्या प्रश्नांची सुनावणी करण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण तयार करण्याचा विचार सरकार करतंय अशी माहिती सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली. राज्यात एकूण 86 हजार गृहनिर्माण संस्था आहेत. त्यात मुंबईत 36 हजार, ठाण्यात 22 हजार आणि उरलेल्या पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नागपूर आणि औरंगाबाद याठिकाणी आहेत. शिवाय राज्यभर तालुक्यांच्या ठिकाणीही अशा संस्था वाढत आहेत. त्यामुळे प्राधिकरण स्थापण्याचा विचार सुरु आहे. प्राधिकरणाची स्थापना होण्यापूर्वी मुंबईसह राज्यभरात 7 ठिकाणी हाऊसिंग मेळावे भरवले जाणार आहेत.

close