कशेडी घाटाचा मार्ग मोकळा

September 6, 2011 2:10 PM0 commentsViews: 2

06 सप्टेंबर

अखेर 63 तासांनी कशेडी घाटातील वाहतूक सुरू झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून दरड कोसळल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. गेल्या तीन दिवसात चार वेळा घाटात दरड कोसळल्यामुळे कामात अडथळे निर्माण होतं होते. पर्यायी मार्ग म्हणून कोल्हापूर मार्ग वाहतूक वळवण्यात आली होती. दरडीचे विघ्न आज सकाळपर्यंत सुरू होते. साडे दहाच्या सुमाराला डोंगरावरुन दरडीचा काही भाग कोसळला. त्यानंतर बांधकाम विभाग आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या कर्मचार्‍यांनी तातडीनं, हा ढिगारा हलवला. त्यामुळे हलक्या वाहनांची वाहतूक सुरू झाली.

close