मुख्यमंत्र्यांनी 7 महिन्यात 800 फाईल्सचा केला निपटारा

September 6, 2011 11:09 AM0 commentsViews: 3

06 सप्टेंबर

आपल्या 10 महिन्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीत फारस काम केलं नसल्याचा ठपका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर ठेवण्यात येत होता. त्यांच्याकडून फायलींचा निपटारा लवकर केला जात नसल्याची टीका होत होती. पण जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या काळात मुख्यमंत्र्यांनी आठेश फाईल्स हातावेगळ्या केल्या आहेत.

वेगवेगळ्या कामाच्या जवळपास तेराशे फाईल्स निर्णयासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडे आल्या होत्या. ज्या फाईल्स हातावेगळ्या केल्या त्यामध्ये नगरविकास,महसूल,गृह, गृहनिर्माण अशा महत्वाच्या खात्यांच्या फाईल्सचा समावेश आहे. तसेच भेंडीबाजार,कल्टर रिडेव्हलपमेन्ट सारखा मेगा प्रोजेक्ट मुख्यमंत्र्यांनी मंजूरी दिली.

मुंबईतल्या जुन्या 14 हजार इमारतींना वाढीव एफएसआय देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच नवी मुंबई एअरपोर्ट आणि जैतापूर प्रकल्पला पर्यावरणाची मंजुरी मिळवून घेण्याचे कामही त्यांनी केले. मुख्यमंत्र्यांनी आमदारांसोबत ईमेलवरुन संवाद साधण्याची नवी योजना राबली त्याला भरघोस प्रतिसाद मिळतोय. त्याचाही काम लवकर हातावेगळे करायला मदत होत आहे. 'मी माझ्या पध्दतीनं काम करतो वैयक्तीक हितापेक्षा राज्याच्या हिताला प्राधान्य देतो अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आयबीएन-लोकमतशी बोलतांना दिली.

close