सोमालियात अपहरण झालेल्या जहाजाची सुटका

November 16, 2008 5:58 AM0 commentsViews: 4

16 नोव्हेंबरसोमालियातल्या समुद्रचाच्यांनी अपहरण केलेल्या जपानच्या एमव्ही स्टॉल्ट वेलॉर या जहाजाची आज अखेर सुटकी झाली. तब्बल दोन महिन्यानंतर या जहाजाची सुटका करण्यात आली. जहाजावरचे 18 भारतीय खलाशी सुरक्षित आहेत. या समुद्रचाच्यांनी जहाजाच्या सुटकेसाठी 6 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. त्यानुसार त्यांना खंडणीची रक्कम देण्यात आल्याचं समजतंय. पण नेमका आकडा कळू शकलेला नाही. दोन महिन्यांपूर्वी अदेनच्या आखातामध्ये सोमालियान चाच्यांनी या जहाजाचं अपहरण केलं होतं. त्यावर 18 भारतीय खलाशी होते. या चाच्यांनी नुकतंच आणखी एका भारतीय आणि सौदी अरेबियाच्या जहाजावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. पण समुद्रात गस्त घालणार्‍या भारतीय नौदलानं हा हल्ला परतवून लावला होता.

close