भूविकास बँकेच्या पुनरुज्जीवनाचा सरकारचा प्रस्ताव

September 6, 2011 4:24 PM0 commentsViews: 165

06 सप्टेंबर

भूविकास बँकेच्या पुनरुज्जीवनाचा प्रस्ताव सरकारने तयार केल्याची माहिती राज्याचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली. यापूर्वी राज्यात 29 जिल्ह्यात भूविकास बँका होत्या. आता त्याची संख्या 12 किंवा 13 होणार आहे. त्यात कोकण विभागासाठी एक, पश्चिम महाराष्ट्रातल्या सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर या जिल्ह्यासाठी प्रत्येकी एक बँक असेल. तर विदर्भासाठी नागपूर आणि अमरावती इथं प्रत्येकी एक शाखा असेल.

मराठवाड्यासाठी लातूर, उस्मानाबाद आणि औरंगाबाद इथं प्रत्येकी एक शाखा असेल. खान्देशसाठी अहमदनगर, नाशिक इथं प्रत्येकी एक शाखा असणार आहे. आता सध्या 450 कोटी रुपयांची थकबाकी वसूल करायची आहे. एक लाख शेतकर्‍यांकडे ही थकबाकी आहे. 31 मार्च 2012 पर्यंत एकरकमी पैसे भरणार्‍या शेतकर्‍यांना व्याज माफी देण्याचा विचार आहे. वसूल झालेल्या रकमेपैकी 30 टक्के कर्मचार्‍यांच्या पगारासाठी वापरायची आहे. याबाबतचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर ठेवला जाणार आहे.

close