आघाडीतील मतभेदामुळे विकासकामांवर वाईट परिणाम : विकिलिक्स

September 6, 2011 5:43 PM0 commentsViews: 4

06 सप्टेंबर

विकिलिक्सच्या जाळ्यात आता राज्यसरकारचे कामकाजवर ही बोट ठेवले आहे. याबद्दलची एक केबल जाहीर केली आहे. अमेरिकन दूतावासाने राज्य सरकारच्या कामाबद्दलचं त्याच मत केबल द्वारे अमेरिकन सरकारला पाठवलं आहे. या केबलमध्ये राज्य सरकारमधील मतभेदाचा राज्याच्या विकासकामांवर वाईट परिणाम झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्यानंतर हा केबल पाठवण्यात आला. राज्यातील नेत्यांची स्थिती इतर राज्यातील नेत्यांसारखी झाली. सर्वच पक्षात घरा़णेशाही वाढली आहे. नेत्यांची मुल राजकारणात आणली जात आहेत. भ्रष्टाचार वाढला आहे. बिल्डर आणि जमीन विकासक फायदा लाटत आहेत. दहशतवादी हल्यानंतर राज्य सरकारने जवळपास 1 वर्षानंतर मुंबईच्या सुरक्षीततेबद्दल पॉलिसी जाहीर केलीय असही या केबलमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

विकिलिक्सचा गौप्यस्फोट अमेरिकेचं मत- राज्यात गेल्या दोन दशकांपासून चांगल्या राजकीय नेतृत्वाचा अभाव – महत्त्वाच्या विकास योजना राबवण्यात आघाडी सरकार अपयशी – महाराष्ट्रातही इतर राज्यांप्रमाणेच घराणेशाही आणि भ्रष्टाचार- स्वतःचं हित जपण्यातच मंत्री मग्न, महत्त्वाच्या विषयांकडे दुर्लक्ष- आघाडीचे मंत्री जाहीरपणे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतात – 26/11 नंतर आरोप-प्रत्यारोपाचं प्रमाण वाढलं- 26/11 नंतर मुंबईच्या सुरक्षेत काही प्रमाणात सुधारणा करायला यश- काही प्रामाणिक पोलीस अधिकार्‍यांमुळे सुरक्षा व्यवस्था सुधारली- पण पोलीस दलाचं सक्षमीकरण करण्याच्या नेत्यांच्या इच्छाशक्तीवर प्रश्नचिन्ह

close