सीरिज जिंकण्यासाठी धोणी ब्रिगेडची धडपड

September 6, 2011 4:37 PM0 commentsViews: 2

06 सप्टेंबर

भारत आणि इंग्लंड दरम्यानची दुसरी वन डे मॅचमध्ये पावसाचा व्यत्यय आला आहे. पण भारताच्या 11 जणांच्या टीमवर नजर टाकली तर लक्षात येईल एरवी 7 बॅट्समन घेऊन खेळणार्‍या टीममध्ये आज सहाच बॅट्समन आहेत. पण ही धोणीची नवी स्ट्रॅटजी नाही. तर टीममध्ये तेवढेच फिट बॅट्समन शिल्लक आहेत. म्हणजे धोणीसमोर दुसरा पर्यायच नाही.

या दुखापती टेस्ट सीरिजमधल्या आणि त्यानंतर नव्या टीमसह भारतीय टीम वन डे सीरिज खेळायला सज्ज झाली. पहिल्या वन डे मध्ये पार्थिव पटेल आणि विराट कोहली यांच्या हाफ सेंच्युरीमुळे वन डे साठी तरी बॅटिंग लाईन अप जुळून आलीय असं वाटत होतं. पण इतक्यात माशी शिंकली.रोहीत शर्मा आणि सचिन तेंडुलकर आता वन डे सीरिजमधून बाहेर झाले आहेत. पण या दोघांच्या बाहेर जाण्याने धोणीसाठी अंतिम अकरा जणांची निवड कधी नव्हे इतकी सोपी झाली. कारण निवडण्यासाठी त्याच्यासमोर खेळाडूंचा पर्यायच नाही. टीममध्ये आता खेळायला पूर्णपणे फिट असे फक्त सहा बॅट्समन आहेत. अजिंक्य रहाणे आणि पार्थिव पटेल ओपनिंगला. त्यांच्यानंतर तिसर्‍या क्रमांकावर येईल राहुल द्रविड. विराट कोहली, सुरेश रैना आणि स्वत: धोणी झालं भारतीय टीमकडचे सगळे पर्याय इथंच संपत आहे.

रोहित आणि सचिन ऐवजी मनोज तिवारी, बद्रीनाथ यांची निवड बीसीसीआयने केली. पण बद्रीनाथकडे इंग्लंडचा व्हिसा नाही. आणि तो मिळून लंडनमध्ये पोहोचायला त्याला 2-3 दिवस नक्की लागतील. तर मनोज तिवारी मॅचपूर्वी जेमतेम 2-3 तास लंडनमध्ये पोहोचला आहे. आणि दमलेला असताना मॅच खेळायची वेळ त्याच्यावर येईल.

आता पुन्हा प्रश्न आला याची जबाबदारी कोण घेणार ? टीम मॅनेजमेंट, बीसीसीआय की निवड समिती ? रोहीतची दुखापत अचानक उद्भवलेली आहे. पण सचिन पूर्ण फिट नव्हता तर त्याच्या ऐवजी राखीव खेळाडू आधीच पाठवता आला नसता का ? टीम मॅनेजमेंटनेही खेळाडूची मागणी करणं आवश्यक नव्हतं का ?

या इंग्लंड दौर्‍यात असे अनेक प्रश्न उभे राहत आहे. पण उत्तरं कोणाकडूनच मिळत नाही. आणि खरी गंमत ही की आज मॅचमध्ये पाच बॉलर्स खेळवले तरी त्यांच्याकडून इंग्लंडच्या दहा विकेट मिळतील का हा ही एक प्रश्नच आहे.

close