मी कोर्टाचा अवमान केला नाही – राज ठाकरे

November 16, 2008 6:46 AM0 commentsViews: 5

16 नोव्हेंबर, मुंबई माझ्यावरची भाषणबंदी कोर्टाने घातलेली नाहीये तर पोलिसांनी घातलेली आहे. त्यामुळे त्याला कटेम्प्ट ऑफ कोर्ट असं म्हणणं चुकीचं असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बीएमसी कामगार मेळाव्यात काल ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी मीडियावरदेखील टीका केली. ' माझ्यावर भाषणबंदी कोर्टाने नाही, तर पोलिसांनी घातली आहे. पण अभ्यास न करता माझ्यावर कोर्टाचा अपमान केल्याचा आरोप न्यूज चॅनलवर केला जातो. टीआरपी वाढवण्यासाठी माझा वापर केला जातोय. ' असं ते म्हणाले.

close