कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यासह भाजपच्या नेत्यांची गडकरींकडे धाव

September 6, 2011 1:24 PM0 commentsViews: 2

06 सप्टेंबर

कर्नाटकचे मुख्यमंत्री सदानंद गौडासह कर्नाटकचे चार भाजपचे वरिष्ठ नेते आज सकाळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन गडकरी यांच्या नागपूरच्या वाड्यावर त्यांना भेटण्यासाठी आले आहेत. यात कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा, कर्नाटकचे सहसंघटन मंत्री वि. सतिश, प्रभारी धर्मेंद्र प्रधान आणि संघटन मंत्री संतोष हे सर्व भाजपचे नेते आज गडकरींच्या भेटीला आले आहेत. गडकरीं सोबत सध्या या सर्वांची बंद द्वार चर्चा सुरू आहे. चर्चा आहे की,खणन घोटळ्यात अडकलेले कर्नाटकचे माजी मंत्री रेड्डी बंधूंना सीबीआय ने अटक केली आहे. यामुळे भाजपची कोंडी झाली आहे. हि कोंडी फोडण्यासाठी आणि बळ मिळविण्याकरिता कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसह हे सर्व भाजपचे राजकीय नेते गडकरींच्या भेटीला आल्याचं कळते.

close