दहशतवादापुढे झुकणार नाही – पंतप्रधान

September 7, 2011 12:47 PM0 commentsViews: 3

7 सप्टेंबर, बांगलादेश

दिल्लीत झालेला स्फोट ही अतिशय दुदैर्वी घटना आहे. अशा दहशतवादापुढे झुकणार नाही असं पंतप्रधानांनी बांगलादेश इथे म्हटलंय. पंतप्रधान मनमोहन सिंग सध्या बांगलादेशच्या दौ-यावर आहेत. स्फोटाच्या घटनेमुळे आपण व्यथित झालो असून या स्फोटात बळी गेलेल्या नातेवाईकांच्या आणि जखमींच्या दु:खात सहभागी असल्याचंही त्यांनी म्हटलं. दहशतवादाविरोधातली लढाई मोठी असल्याने अशा घटनांवर सगळ्या राजकीय पक्षांनी आणि सर्वसामान्य जनतेने एकत्र यायला हवं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं.

close