दिल्ली बॉम्बस्फोटातील मृतांची संख्या 12 वर

September 8, 2011 7:56 AM0 commentsViews: 5

08 सप्टेंबर

दिल्लीत बुधवारी हायकोर्टाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटातील मृतांची संख्या आता 12 झाली आहे. 34 वर्षांच्या तारसेम सरुप सिंग यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या बारा जणांपैकी अकरा मृतदेहांची ओळख पटली आहे. तर 91 जण जखमी झाले आहेत. जखमींवर राममनोहर लोहिया, एम्स आणि सफदरजंग हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. यातल्या काही जणांची प्रकृती गंभीर आहे

close