खासदारांना अटक होतेय तर मलाही अटक करा – अडवाणी

September 8, 2011 8:32 AM0 commentsViews: 3

08 सप्टेंबर

अपेक्षेप्रमाणे आज संसदेत 'कॅश फॉर व्होट' प्रकरण गाजलं. कामकाज सुरू होताच दोन्ही सभागृहांचा प्रश्नोत्तराचा तास रद्द करून कॅश फॉर व्होट प्रकरणावर चर्चा घेण्याची मागणी भाजपने केली. त्यामुळे गदारोळाला सुरूवात झाली. या गदारोळातच अडवाणींनी सरकारवर हल्ला चढवला. संसदेत भाजप खासदारांनी नोटा दाखवल्या, त्यात त्यांची चूक काय असा खडा सवाल करत अडवाणींनी सरकारवर टीका केली. जर कुलस्ते आणि भगोडा यांचं कृत्य चुकीचं असेल आणि त्याबद्दल त्यांना जेल झाली असेल तर त्याची जबाबदारी म्हणून तोच निकष लावून मलाही अटक करा अशी जोरदार मागणी अडवाणींनी केली. त्याबरोबरच अमरसिंग कुणासाठी काम करत होते. त्याचा फायदा कुणाला झाला याचं उत्तर सरकारनं द्यावं अशी मागणीही भाजपनं केली. तसेच लालकृष्णअडवाणींनी पुन्हा एकदा रथयात्रा काढण्याचं जाहीर केलं आहे. यावेळी त्यांची ही रथयात्रा देशातील वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात असणार आहे. आज दिल्लीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली.

संसदेचं कामकाज वाया

- 26 दिवसांत लोकसभेत फक्त 104 तास, 3 मिनिटं कामकाज झालं – 51 तास, 6 मिनिटं गदारोळात वाया गेली- राज्यसभेचे 53 तास वाया गेले – लोकसभेत 14, तर राज्यसभेत 9 विधेयकं मंजूर करण्यात आली- प्रश्नोत्तराच्या तासात 500 पैकी फक्त 59 प्रश्नांची उत्तर देण्यात आली

close