बिग बी करणार हॉलीवूडमध्ये एण्ट्री

September 8, 2011 8:42 AM0 commentsViews: 2

08 सप्टेंबर

बुढ्ढा होगा तेरा बाप म्हणत त्याने बॉलिवूडला आरक्षणाचं महत्व समजावलं पण आता अमिताभ बच्चन लवकरच बॅझ लर्मन या हॉलिवूडच्या नावाजलेल्या दिग्दर्शकाबरोबर काम करणार असल्याची चर्चा आहे. हा सिनेमा द ग्रेट गॅट्झबाय या कादंबरीवर आधारीत असून यात अमिताभ 'मेयर वॉल्फशीम' या अंडरवर्ल्डच्या डॉनच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात लिओनार्डा डी कॅप्रिओची मुख्य भूमिकाआहे. बीग बीच्या फॅन्ससाठी ही पर्वणी असेल यात काहीच शंका नाही.

close