सोनिया गांधी अमेरिकेहून परतल्या

September 8, 2011 8:52 AM0 commentsViews: 2

08 सप्टेंबर

अमेरिकेत शस्त्रक्रिया झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आज पहाटे भारतात परतल्या. अण्णांचं आंदोलन, कॅश फॉर व्होट्स, दिल्लीतला बाँबस्फोट असे अनेक ज्वलंत मुद्दे केंद्र सरकार आणि काँग्रेस पक्षासमोर असले. तरी त्या ताबडतोब सक्रिय राजकारणात परणार नाही.

देशातील सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती सोनिया गांधी. मायदेशी परतल्या आहेत. आणि काँग्रेस नेते सांगतायत की त्यांची तब्येत आता व्यवस्थित आहे. पण त्यांच्या अनुपस्थिती त्यांच्या पक्षाची आणि सरकारची स्थिती ब-यापैकी बिघडली. अण्णा हजारे राळेगणला परतले असले. तरी त्यांच्या आंदोलनाचे पडसाद अजूनही दिल्लीत जाणवत आहे. यूपीए सरकार भ्रष्ट असल्याची प्रतिमा अण्णांच्या उपोषणामुळे बळावली. आणि सोनिया गांधींच्या गैरहजेरीत काँग्रेस पक्ष दिशाहीन आणि केंद्र सरकार गोंधळलेलं असतं हे सिद्ध झालंय.

सोनिया नसताना राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली जी 4 जणांची समिती बनवण्यात आली होती .ती अण्णांचं आंदोलन हाताळण्यात सपशेल अपयशी ठरली. त्यामुळे सगळ्या समस्या आता सोनियांनी सोडवाव्यात अशी पक्षाची अपेक्षा आहे.

सोनियांसमोरची आव्हानं

- कॅश फॉर व्होट्स घोटाळ्याने पुन्हा डोकं वर काढलंय; अमर सिंग अटकेत गेल्यामुळे काँग्रेस अडचणीत सापडलंय- अण्णांचं आंदोलन हाताळण्यात सरकारचे अपयश ; काँग्रेसच्या तरुण खासदारांनी पहिल्यांदाच स्वतःच्या पक्षावर जाहीर टीका केली- भ्रष्टाचारविरोधी वातारणाचा राजकीय फायदा भाजप घेण्याचा प्रयत्न करतंय- यूपीए सरकारमधील अनेक मंत्री एकमेकांविरोधात कारवाया करतायत; त्यांना आवर घालणे

पण मोठी शस्त्रक्रिया झाल्यामुळे सोनियांना अशक्तपणा आला असून त्या पुढचे तीन ते चार महिने सक्रीय राजकारणापासून दूर राहतील अशी सूत्रांची माहिती आहे.

close