नानाशी कोणताही वाद नाही – राज ठाकरे

September 8, 2011 6:05 PM0 commentsViews: 58

08 सप्टेंबरमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नाना पाटेकरांच्या घरी भेट देऊन गणपतीचं दर्शन घेतलं. नाना पाटेकरशी आपला कोणताही वाद नसून नानाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे तसा मला प्रतिक्रिया देण्याचा अधिकार असल्याचे यावेळी राज ठाकरेंनी म्हटलं. तसेच दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटामागे नक्की काय आहे, याचा खोलवर तपास आवश्यक असल्याचं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलंय. त्याचबरोबर पोलिसांवर जबाबदारी ढकलण्यापेक्षा सरकार म्हणून काही जबाबदारी घेणार की नाही, असाही सवाल त्यांनी केला.

शिरीष पारकरांच्या एका प्रश्नावर अभिनेता नाना पाटेकर यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं आमच्या भावनांचा विचार करून सवता सुभा मांडू नये असं म्हटलं होतं. त्यावर नानानं माहिती नसलेल्या गोष्टीत नाक खुपसू नये असा प्रतिटोला राजने मारला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी आज नानाच्या घरी भेट दिली. भेटीनंतर बोलताना नेहमीच नानांच्या गणपतीच्या दर्शनाला येतो. वाद गैरसमज काहीच नाही असं स्पष्टीकरण राज यांनी केलं. नानांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या, तशीच मीही माझी मतं व्यक्त केली असंही राज यांनी म्हटलं.

close