मुंबईतील सतराशे निवासी डॉक्टर उद्या संपावर

September 8, 2011 10:39 AM0 commentsViews: 4

08 सप्टेंबर

मुंबईकरांना पुन्हा एकदा डॉक्टरांच्या संपाला सामोरं जावं लागणार आहे. उद्या सकाळी आठ वाजेपासून केईएम आणि नायर हॉस्पिटलचे डॉक्टर संपावर जाणार आहे. सायन हॉस्पिटलमध्ये काल एका दहा वर्षाच्या मुलीचा न्युमोनियामुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी डॉक्टरांनाच मारहाण केली. यात एका डॉक्टरचा पाय फ्रॅक्चर झाला होता. या मारहाणीविरोधात सायन हॉस्पिटलचे डॉक्टर संपावर गेले आहेत. या संपाबाबत बोलणी फिस्कटल्यामुळे संप सुरूच ठेवण्याचा निर्णय सायनच्या डॉक्टरांनी घेतला आहे. या संपाला केईएम आणि नायर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनीही पाठिंबा दिला. या तिनही हॉस्पिटलमधील एकूण सतराशे निवासी डॉक्टर आता संपावर जाणार आहे. डॉक्टरांना होत असलेल्या मारहाणीविरोधात कडक पावलं उचलावी, अशी या डॉक्टरांची मागणी आहे.

close