पुढची लढाई निवडणूक प्रक्रिया सुधारण्यासाठी – किरण बेदी

September 9, 2011 10:04 AM0 commentsViews: 7

09 सप्टेंबर

जनलोकपालच्या आंदोलनानंतर टीम अण्णा आता दुसर्‍या आंदोलनासाठी सज्ज झाली आहे. आता निवडणूक सुधारणा हा आपला पुढचा कार्यक्रम असेल असं अण्णांच्या सहकारी किरण बेदी यांनी पुण्यात बोलताना सांगितलं. तसेच या कोअर कमिटीत स्वामी अग्निवेश यांचा समावेश नसेल असंही टीम अण्णांनी स्पष्ट केलं. टीम अण्णांमधील एक सदस्या किरण बेदी यांनी पुण्यात हे स्पष्ट केलं.

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत भ्रष्टाचाराविरोधात जनलोपाल विधेयकासाठी दुसरी लढाई जिंकली. हा विजय अण्णांनी जनतेमुळे झाला असं सांगत ही लढाई अर्धी जिंकली आहे असं मत ही व्यक्त केलं होतं. या पुढे आपली लढाईही निवडणूक प्रक्रिया सुधारण्यासाठी असणार अशी घोषणाही अण्णां नी केली होती. आज पुण्यात टीम अण्णांच्या सदस्य किरण बेदी यांनी पुढचा लढा निवडणूक प्रक्रिया सुधारण्यासाठी असणार आहे असं पुन्हा स्पष्ट केलं. पण त्याचं बरोबर स्वामी अग्निवेश यांचा समावेश नसणार असं जाहीर केलं. अण्णांच्या आंदोलनात स्वामी अग्निवेश यांनी काढता पाय घेतला होता.

close