अमेरिकेवर पुन्हा दहशतवादी हल्ल्याचे सावट ; 9/11 ला 10 वर्ष

September 9, 2011 11:23 AM0 commentsViews: 4

09 सप्टेंबर

अमेरिकेत झालेल्या 9/11 च्या हल्ल्याला रविवारी 10 वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेवर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अमेरिकेत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. एका माहितीनुसार अफगाणिस्तानातून आलेल्या 3 संशयित व्यक्तींनी अमेरिकेत शिरकाव केला आहे. वॉशिंग्टन डीसी आणि न्यूयॉर्क हे त्यांचं लक्ष्य असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली. याच काळात कार बॉम्ब किंवा ट्रक बॉम्बचा वापर करण्यात येण्याचा अंदाज असल्याने सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. येत्या रविवारी 11 सप्टेंबरला वर्ल्ड ट्रेड सेंटरवरच्या भीषण हल्ल्याला 10 वर्ष पूर्ण होतायत त्या पार्श्वभूमीवर हे इशारे देण्यात आले आहे.

close