मनसे कार्यकर्त्यांनी अधिकार्‍याला काळे फासले

September 9, 2011 11:32 AM0 commentsViews: 1

09 सप्टेंबर

नाशिक जिल्हा परिषदेचे सीईओ रणजीतकुमार मेहता आणि दोन अधिकार्‍यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं. शहरातील अंतापूरच्या पाणीपुरवठा योजनेतल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी गावकर्‍यांतर्फे करण्यात येत आहे. त्यासाठी गेल्या 5 दिवसांपासून अंतापूरचे गावकरी जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसले आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांनी त्यांची दखल घेतली नसल्याचे आंदोलकांचे म्हणणं आहे. अधिकार्‍यांविरोधात करण्यात आलेल्या या आंदोलनाचा निषेध करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी 5 जणांना ताब्यात घेतले आहे.

close