कांद्यावर निर्यात बंदी विरोधात शेतकरी रस्त्यावर

September 9, 2011 12:34 PM0 commentsViews: 2

09 सप्टेंबर

केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी लागू केल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकर्‍यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. कळवणमध्ये 700 शेतकरी रस्त्यावर उतरले होते. शेतकरी संघटना आणि सर्व पक्षांनी रास्ता रोको केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी 250 आंदोलकांना ताब्यात घेतलं. नाशिक जिल्ह्यातील 10 लाख टन निर्यात योग्य कांद्याला याचा फटका बसला आहे. याच्या निषेधार्थ नाशिक आणि धुळे जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये आज कांद्याचे लिलाव बंद पाडण्यात आले. लासलगाव, मनमाड, पिंपळगाव, चांदवड आणि उमराणे या बाजारसमित्यांमध्ये आज कांद्याचे लिलाव सुरूच झालेले नाहीत. काल पर्यंत घाऊक बाजारात शेतकर्‍यांना कांद्याचा भाव 12 रूपये मिळत होता मात्र निर्यात बंदीच्या निर्णयामुळे हे भाव घसरण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातल्या सर्व बाजार समित्यांनी आणि शेतकरी संघटनांनी या बंदीचा निषेध केला.

close