गणेश मंडळ कार्यकर्त्यांच्या मारहाणीत प्राचार्यांचा मृत्यू

September 9, 2011 1:40 PM0 commentsViews: 1

09 सप्टेंबर

गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीत नाशिकमध्ये एका प्राचार्यांचा मृत्यू झाला आहे. प्राचार्य उत्तम नागरे हे व्ही एन नाईक संस्थेच्या आयआयटी चे प्राचार्य होते. तिडके कॉलनीतल्या मिलिंद मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांशी त्यांचा वाद झाला होता. त्यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतले आहे.

close