मनिष तिवारींनी लेखी माफी मागावी !

September 8, 2011 5:21 PM0 commentsViews: 6

08 सप्टेंबर

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काँग्रेसचे प्रवक्ते आणि सरचिटणीस मनिष तिवारी यांना नोटीस पाठवली आहे. तिवारी यांनी लेखी स्वरुपात माफी मागावी अशी मागणी या नोटिसीत स्पष्ट करण्यात आलं आहे. अण्णांच्या वतीनं त्याचे वकील मिलींद पवार यांनी नोटीस पाठवली. बुधवारी ही नोटीस पाठवण्यात आली. अण्णा हजारे डोक्याच्या केसापासून ते पायाच्या अंगठ्यापर्यंत भ्रष्टाचारात बुडाले आहे अशी टीका मनिष तिवारी यांनी केली होती. अण्णांच्या उपोषण सुरू असतांना लोकसभेत पंतप्रधानांच्या निवेदन सादर केलं. या निवेदनात अण्णांच्या आंदोलनाला आपल सलाम आहे अशा शब्दात पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कौतुक केलं होतं. पंतप्रधानांच्या या विधानानंतर तिवारी यांनीही दिलगिरी व्यक्त करत जाहीर माफी मांगितली होती.

close