टीम अण्णा राळेगणमध्ये

September 9, 2011 2:17 PM0 commentsViews: 5

09 सप्टेंबर

जनलोकपाल विधेयकाच्या आंदोलनाची यापुढची दिशा ठरवण्यासाठी टीम अण्णा राळेगणमध्ये पोहचत आहे. अरविंद केजरीवाल याआधीच राळेगणमध्ये पोहचले आहेत. अण्णा हजारेंशी चर्चा करून आंदोलनाची यापुढची दिशा ठरवण्यात येणार असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. आज संध्याकाळी किरण बेदी यांचे राळेगणमध्ये आगमन झाले आहे तर उद्या सकाळी प्रशांत आणि शांती भूषणही राळेगणमध्ये पोहचत आहेत. टीम अण्णांची उद्या आणि परवा दोन दिवसांची बैठक होणार आहे. निवडणूक सुधारणा हा या बैठकीचा अजेंडा असणार आहे.दरम्यान, किरण बेदींवरचा हक्कभंग प्रस्ताव मागे घेण्याचा सरकारचा विचार म्हणजे त्यांना उशीरा सुचलेलं शहाणपण आहे. असा टोला अण्णा हजारेंनी लगावला आहे. लोकपाल आंदोलनाच्या वेळी उभी राहिलेली जनता पाहून सरकार घाबरलं आणि त्यांनी हा निर्णय मागे घेतला असंही अण्णा म्हणाले. तर दुसरीकडे टीम अण्णाच्या सगळ्या सदस्यांना अस्सल ग्रामीण जेवणाच्या मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे.

close