मुंबई महापालिकेच्या उपायुक्तांना लाच घेताना अटक

September 9, 2011 4:25 PM0 commentsViews: 5

09 सप्टेंबर

मुंबई महापालिकेचे उपायुक्त चंद्रशेखर रोकडे यांना एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. ऍन्टी करप्शन ब्युरोने ही कारवाई केली. चंद्रशेखर रोकडे हे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त आहेत. भायखळ्याच्या ऑफिसमध्येच त्यांना लाच घेताना अटक करण्यात आली. दोन महिन्यांपूर्वीच अतिक्रमण विरोधी कारवाई करताना रोकडे यांच्यावर अनधिकृत बांधकाम करणा-या लोकांनी हल्ला केला होता.

close