पुण्यात होतोय मराठी-उत्तरभारतीय संस्कृतीचा संगम

November 16, 2008 1:25 PM0 commentsViews: 3

16 नोव्हेंबर, पाटसमनोहर बोडखेमनसेच्या आंदोलनामुळं मुंबईत उत्तरभारतीय विरुद्ध मराठी असं चित्र उभं राहिलं. पण केवळ मुंबईसारख्या शहरातच नाही तर महाराष्ट्राच्या खेडोपाड्यातही उत्तर भारतीय आणि मराठी माणसं गुण्यागोविंदानं नांदताना दिसतात. यावरच आहे आयबीएन लोकमतचा हा स्पेशल रिपोर्ट.पुनदेव चौधरी गेल्या 30 वर्षांपासून पुणे जिल्ह्यातल्या पाटस इथं राहतात. जवळच्याच साखर कारखान्यात ते काम करतात. आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळं त्यांनी इथल्या माणसांचा विश्वास संपादन केला आहे. पुनदेव यांचा लॉंन्ड्रीचाही व्यवसाय आहे. त्यामुळं परिसरातल्या ग्राहकांची दिवसभर त्यांच्याकडं वर्दळ असते. त्यांच्या मुलांचा जन्म महाराष्ट्रातच झालाय. त्यामुळं आता इथल्या मातीशी नातं घट्ट झाल्याची त्यांच्या कुटुंबियांची भावना आहे. या बिहारी कामगारांच्या सुख- दुःखात मराठी कामगारही सहभागी होतात. मराठी संस्कृतीशी एकरूप झालेल्या अशा अनेक पुनदेवांमुळंच विविधतेतून एकता हे भारताचं वैशिष्ट्य ठळकपणे समोर येतं.

close