अडवाणींच्या प्रस्तावित रथयात्रेला भाजपचा हिरवा कंदील

September 9, 2011 5:34 PM0 commentsViews: 7

09 सप्टेंबर

लालकृष्ण अडवाणी यांनी काल भ्रष्टाचाराविरोधात रथयात्रेची घोषणा केली. भाजपच्या गुरुवारी झालेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीत अडवाणींच्या रथयात्रेला पाठिंबा देण्यात आला. पण अडवाणींना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करण्याबद्दल भाजपने सावध भूमिका घेतली. अडवाणींच्या या रथयात्रेविषयी संघामध्येही संभ्रम आहे.

सोमनाथ ते अयोध्या या अडवाणींच्या रथयात्रेनं भाजपला सत्तेच्या परिघात आणलं. दोन दशकानंतर आता अडवाणी पुन्हा एकदा रथयात्रेसाठी सज्ज झाले आहेत. पण त्यांच्या या घोषणेमुळे संघ परिवारात खळबळ माजली. सरसंघचालकांना अडवाणींच्या यात्रेबद्दल काहीच माहिती नसल्याचे सूत्रांनी सांगितले. पण अडवाणींनी रथयात्रेची जाहीर घोषणा केल्यामुळे त्यांना पाठिंबा देण्याशिवाय संघाकडे दुसरा पर्याय नाही.

अडवाणींच्या आक्रमक भूमिकेमुळे भाजपमध्येही अस्वस्थता निर्माण झाली. मुळात अडवाणींच्या नेतृत्वावरून पक्षांतर्गत मतभेद आहेत. भाजपची सत्ता जाऊन सात वर्षांचा काळ लोटला. पण वाजपेयी-अडवाणीनंतरच नेतृत्व कुणाकडे यावर अजून एकमत होत नाही. 2014 च्या निवडणुकीत भाजपचा पंतप्रधानांचा उमेदवार कोण असेल, याचं उत्तरही त्यांच्याकडे सध्या नाही.

वाजपेयी नंतर आपणच पंतप्रधानांचे दावेदार असल्याचा अडवाणींचा ठाम विश्वास होता. केव्हाच तडा गेला पण अडवाणींची सुप्त इच्छा मात्र कायम आहे.पण आता काळ मात्र बदलला आहे.

close