उत्तराखंडचे मुख्यमंत्री रमेश पोखरीयाल यांची हकालपट्टी

September 10, 2011 5:07 PM0 commentsViews: 5

10 सप्टेंबर

उत्तराखंडचे मुख्यमंत्री रमेश पोखरीयाल निशांक यांची भाजपच्या हायकमांडनी पदावरून हकालपट्टी केली. त्यांच्या जागी माजी मुख्यमंत्री बी. सी. खंडुरी यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. पोखरीयाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत. त्यामुळेच त्यांना पदावरून दूर करण्यात आले आहे. पुढच्या वर्षी होणार्‍या निवडणुकीत धोका पत्करायचा नको, यासाठी पोखरीयाल यांना हटवण्यात आलं. पण पोखरीयाल यांच्यावरचे भ्रष्टाचाराचे आरोप मात्र निराधार असल्याचे भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

close