नाशकात कांद्यावरील निर्यातबंदी विरोधात कांद्याचे लिलाव बंद

September 10, 2011 10:38 AM0 commentsViews: 3

10 सप्टेंबर

कांद्यावरील निर्यातबंदी हटवेपर्यंत नाशिक जिल्ह्यातील सर्व समित्यांमध्ये कांद्याचा लिलाव बंद राहणार आहेत. पिपंळगाव बसवंत बाजार समितीत आज दुपारी सर्व बाजार समित्यांच्या संचालकांची बैठक झाली. आणि यात हा निर्णय घेण्यात आला आहे. निर्यातबंदी मागे घेईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने कांद्यावर लागू केलेल्या निर्यात बंदीविरोधात नाशिकमध्ये असंतोष कायमच आहे. दरम्यान, कांद्यावरील निर्यातबंदी चुकीची असल्याचे सांगत छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारला घरचा आहेर दिला. शेतकरी जर रस्त्यावर उतरले तर त्यात काहीच चुकीचं असणार नाही असं म्हणतं त्यांनी शेतकर्‍यांना पाठिंबा दिला.

close