डॉक्टरांच्या संपावर राज ठाकरेंची मध्यस्थी

September 10, 2011 10:44 AM0 commentsViews: 1

10 सप्टेंबर

सायन हॉस्पिटलच्या निवासी डॉक्टरांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मध्यस्थी केली. राज ठाकरेंनी आज सायन हॉस्पिटलमध्ये जाऊन संपकरी डॉक्टर्सची भेट घेतली. तसेच त्यांच्या काय मागण्या आहेत तेही जाणून घेतलं. तर निवासी डॉक्टर्सच्या मागण्यांना आपला पाठिंबा असल्याचंही त्यांना म्हटलं आहे. डॉक्टर्सच्या अतिशय किरकोळ अशा मागण्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने असे प्रकार घडत असल्याचे राज ठाकरेंनी म्हटलंय. या मुद्यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी राज ठाकरे मुख्यमंत्री आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त सुबोधकुमार यांची भेट घेणार आहेत. तसेच लोकांचा आणखी रोष ओढवून न घेता डॉक्टर्सनी संप मागे घेण्याचे आवाहनही राज ठाकरेंनी केलं.

close