‘जनलोकपाल’ ला विरोध करणार्‍या नेत्यांच्या घराला घेराव घाला – अण्णा हजारे

September 10, 2011 10:54 AM0 commentsViews: 1

10 सप्टेंबर

जनलोकपाल विधेयकावरुन पुन्हा फसवणूक केली तर जंतरमंतरवर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा अण्णांनी दिला. जनलोकपाल विधेयकाला विरोध करणार्‍या नेत्यांच्या घरांना घेराव घाला असं आवाहनसुद्धा अण्णा हजारेंनी केलं. तसेच असे नेते पुन्हा निवडून येऊ नयेत यासाठी निवडणूक सुधारणांची गरज असल्याचे अण्णा हजारेंनी म्हटलं आहे. जनआंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी टीम अण्णांच्या कोअर कमिटीची एक बैठक राळेगणमध्ये सुरू आहे. जनतेच्या आंदोलनाची दिशा ठरवताना जनतेला विश्वासात घेण्याची गरज असल्याने बैठकीआधी पुढची दिशा काय असावी यावर टीम अण्णांनी आज राळेगणमध्ये जनतेच्या सुचना ऐकून घेतल्या यानंतर अण्णांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

close