जाहिरातीत मराठी माणसाची टिंगलटवाळी बंद करा – राज ठाकरे

September 11, 2011 4:47 PM0 commentsViews: 18

11 सप्टेंबर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चित्रपट निर्माते, जाहिरातदार, जाहिरात एजन्सीज आणि सिरीयल निर्मात्यांनी मराठी माणसाची हास्यास्पद व्यक्तिरेखा कलाकृतीत दाखवू नये असा इशारा दिला आहे. टाटा डोकोमो या मोबाईल कंपनीच्या एका जाहिरातीत एक मराठी महिला मोबाईलची चोरी करतानाचं दृश्य दाखवण्यात आलं होतं. याला राज ठाकरे यांनी हरकत घेतली. आणि ही जाहिरात त्वरित टीव्ही चॅनल्सवरून काढून टाकावी अशी मागणी टाटाच्या अधिका-यांनी केली. त्यानंतर राज यांनी टाटाच्या वरिष्ठ अधिका-यांशी फोनवरून बोलणी केली. कंपनीने यासंदर्भात माफी मागून ही जाहिरात मागे घेतली. या जाहिरातीचा संदर्भ देत राज ठाकरे यांनी इतरही जाहिरातदारांना इशारा दिला आहे. अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करून असंही सांगितलं.

close